हा वारा काही मला
अस्थिर केल्याशिवाय राहणार नाही
सळसळणाऱ्या पानांकडे मन वेधतं
निसर्गाच्या हिरव्यागार शालूत
जणू आकाशच लपेटून गेले आहे असे वाटते
ते या टपटप पडणाऱ्या
रिमझिम थेंबातच तर जाणवतं
आल्हाद सुख देणारे
हे पावसाचे थेंब म्हणजे
आकाशाने जमिनीवर मारलेल्या आडव्या-तिडव्या रेघाच
कधी हळुवार शीतल
तर कधी भयानकच वेग असतो
तरीही हवा हवासा वाटणारा पाऊस
क्षणभर अनेक स्वप्नांची
तोरणेच बांधीत असतो आशेच्या वाटेवर.....
ज्याच्या रिमझिम धाऱ्याने
सारी सृष्टी खुलून जाते
ज्याच्या शीतल वाऱ्याने
मन रोमांचित करते
झुळझुळणारी हवा आपल्याला
स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत
नेऊन सोडल्याशिवाय राहणार नाही.