फक्त येवढा तिचा....

 फक्त येवढा तिचा विचार मागतो
मी मनास प्रेम हा विकार मागतो

दु:ख दु:ख काय? ते कशास बोलता?
वेदना जगास मी हजार  मागतो

आटली नदी म्हणून गाव कोरडे
आसवे तुला जरा उधार  मागतो

आरश्यास तोडतात लोक आजचे
मी मलाच आज आर-पार मागतो

एकदा मला बघून कापल्या व्यथा
आज ही सुऱ्यास तीच धार मागतो

--------------स्नेहदर्शन (धुळे)