बटरचिकन

  • ५०० ग्राम बोनलेस चिकन
  • २ ते ३ चमचे चिकन मसाला, १ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ चमचा कसूरी मेथी (ऐच्छिक)
  • १ पेराएवढे आले, ४ ते ५ लसूण पाकळ्या
  • २ टेबलस्पून बदाम किवा काजू पावडर
  • १ मोठा कांदा, ५ ते ६ मध्यम लालबुंद टोमॅटो, १ चमचा टोमॅटो केचप
  • २ टेबलस्पून तेल, २ ते ३ टेबलस्पून बटर
  • १ चहाचा चमचा साखर,मीठ चवीनुसार
  • पाऊण ते १ कप फ्रेश क्रिम
  • कोथिंबिर सजावटीसाठी.
२ तास
२ ते ३ जणांना

चिकन स्वच्छ करून लहान तुकडे करून घेणे. त्याला निम्मी आलेलसूण पेस्ट व चिकनमसाल्यातला निम्मा मसाला (साधारण मोठा चमचाभर) चोळून ५ ते १० मिनिटे ठेवणे. तोपर्यंत कांदा चौकोनी चिरणे, टोमॅटोच्याही फोडी करणे.
एका कढल्यात तेलावर हे चिकन पिस गोल्डन ब्राउन रंगावर परतून घेणे व बाजूला काढून ठेवणे.
त्याच उरलेल्या तेलावर बटर घालणे व त्यावरच कांदा परतणे, चिकन मसाला, गरम मसाला, तिखट, हळद, कसूरी मेथी, आले लसूण पेस्ट घालणे व परतणे. टोमॅटो घालणे व परतणे. अगदी थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवणे. सगळे मिश्रण एकजीव झाले पाहिजे. थोडे गार झाले की मिक्सरमधून हे मिश्रण काढणे. एकदम गुळगुळीत झाले पाहिजे.
आता हे मिश्रण परत कढल्यात घालून ४ ते ५ मिनिटे शिजवणे. १ चमचा टोमॅटो केचप घालणे. हवा असल्यास किंचित तंदूर रंग घालणे. चिकनपिसेस घालणे व परत साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवणे. चमचाभर साखर व चवीनुसार मीठ घालणे. फ्रेश क्रिम घालणे व ढवळणे. कोथिंबिरीने सजवणे.

आच पूर्णवेळ मध्यम ठेवणे.
गरमगरम बटरचिकन नान किवा भाताबरोबर वाढणे.

.