हे गूज या मनाचे

हे गूज या मनाचे

तुज आज दाखवावे

बटांना पुन्हा सावरावे

तुजला पुन्हा सजवावे ll ध्रु. ll

मज देव मानुनी तू

केलीस प्रेमपूजा

मम प्रीत सांगते ही

तुज ईश मी म्हणावे..... ll १ ll

कुणी शोधुदे कितीही

त्यांना न सापडावे

मज तू कुठे लपवावे

तुज मी कुठे लपवावे..... ll २ ll

माझ्या मिठीत ये तू

शमतील वेदनाही

तुझिया लपून केशी

मी दुःख विस्मरावे...... ll ३ ll

हा कोणत्या हिंदी गाण्याचा भावानुवाद आहे हे कृपया ओळखावे......