रांगोळी प्रदर्शन - वर्तमानाचे प्रतिबिंब

raj baba lata bhaar aNu

रांगोळी! मराठी माणसाच्या दिवाळीमध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, उटणे व दिवाळीअंक यांच्या इतकेच महत्वाचे स्थान रांगोळी व रांगोळी प्रदर्शनाला आहे.

सध्या ठाणे येथे न्यू गर्ल्स स्कूल येथे रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. गेली अनेक वर्षे मी हे 'बलवंत मित्रमंडळ' आयोजित प्रदर्शन महापालिका शाळा क्र. १९ येथे पाहत आलो आहे. यंदा शाळेचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्यामुळे प्रदर्शनाचे स्थळ बदलले आहे इतकेच, मात्र त्यातल्या कलाकारांचा सामाजिक दृष्टिकोन मात्र तसाच आहे. या प्रदर्शनात दरवर्षी त्या त्या वर्षातील महत्वाच्या घडामोडी रांगोळ्यांच्या रुपात अप्रतिमरित्या सादर केलेल्या दिसतात.

यंदा सुरू असलेल्या प्रदर्शनात सुद्धा ही परंपरा जपलेली आहे. या प्रदर्शनातील सामाजिक आशयाच्या मला आवडलेलया काही रांगोळ्या.