चेरी केक

  • १२५ ग्राम बटर/तूप/लोणी, १२५ ग्राम साखर
  • ३ अंडी
  • लिंबाची किसलेली साल १ चमचा+ १. ५ चमचा लिंबाचा रस
  • २०० ग्राम मैदा
  • १/४ कप दूध
  • चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ
  • चेरी ५०० ते ७५० ग्राम - काचेच्या बरणीत अथवा टीनमध्ये शुगरसिरपमध्ये असलेल्या आंबटगोड चेरी मिळतात त्या घ्याव्या.
  • जर्मनीत राहणार्‍यांनी sauerkirchen/schatten-morellen नावाने ज्या काचेच्या बरणीतील चेरी मिळतात त्या घ्याव्या.
दीड तास
१२ तुकडे

बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे, अंडी घालून फेटणे. १ चिमूट मीठ, लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे. मैदा थोडा थोडा घालत फेटणे. शेवटी दूध घालून फेटणे.
ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला बटर लावून घेणे व त्यात केकचे मिश्रण एकसारखे पसरणे.
चेरी चाळणीवर ओतणे व पाक काढून टाकणे. आता ह्या चेरीज गोलाकार आकारात अंतराअंतरावर केकवर हलकेच बसवणे.
अवन प्री हिट करणे. १८० अंश से. वर ४५ मिनिटे बेक करणे.
बेक करून गार झाला की वरून पिठीसाखर पेरून सुशोभीत करणे. अथवा व्हिप्ड क्रिम घालून खाणे.

चेरीऐवजी टिंड अननस वापरूनही हा केक करता येतो आणि खूप छान लागतो.

त्सेंटा आजी