दीप...

टाचका संसार,  
जसा बंगला पत्त्यांचा,
त्याला आडोसा मायेच्या 
पदराचा..

हाताला चटका,  
सये सोशीन तव्याचा,  
परी जिवाचा चटका,  
सोसवेना..

वेशाखाचा दाह,  
झरा आटे विहिरीचा,  
परी राखीन ओलावा,  
अंतरीचा..

काळोखाची वाट,
राती अंधार माईना,  
परी दीप मालवो ना 
विश्वासाचा...