सकाळ

शांत नभात नभात, नभ प्रकाश प्रकाश

मनी प्रकाश पाझरे, झाली पहाट पहाट!

खग चराया चालले, रान उठाया लागले

दंव पडाया लागले, लागे दिसाची चाहूल!

सूर्य उगवेल आता, रम्य पसरेल प्रभा

एक अंकुर लाजेल, कोठे उमलेल फूल!

तया फुलाला मागणे, दे रे तुझे ते हासणे

झणी होईल सकाळ, माझ्या मनात मनात....!