शिळ्या पोळीचा खाकरा

  • पोळ्या (शक्यतो शिळ्या. ताज्याही चालतील.)
  • प्रत्येक पोळीगणिक १/२ छोटा चमचा खाद्यतेल
  • तिखट
  • काळा मसाला
  • मीठ (सर्व काही चवीप्रमाणे)
५ मिनिटे
पोळ्यांच्या संख्येवर अवलंबून

१) तेल, तिखट, मीठ आणि काळा मसाला एका वाटीत एकत्र करून घ्यावे.

२) एक पोळी घेऊन तिच्या दोन्ही बाजूंना हे मिश्रण फासावे

३) गॅसची आच गरजेप्रमाणे लहान-मोठी करत तव्यावर पोळी शेकावी. पोळी चांगली कडक झाली पाहिजे मात्र जळू नये.

४) अशा पद्धतीने चांगली कडक झालेली पोळी खमंग खाकऱ्यासारखी लागते.

तिखट-आंबट चटणीसोबत गरम गरम खाकरा खायला खूप मजा येते.

धाकट्या बहिणीबरोबर केलेले प्रयोग