.....आणि मी त्यांना स्विकारलं - २

दुवा क्र. १

मी माझ्या मागच्या लेखात संस्थेचं नाव सांगितलं नव्हतं.

संस्थेचं नाब - ममता फाउंडेशन.

संपर्क - श्री. अमर - ९९२२९२३६५६

२रा लेख लिहायला वेळेआभावी उशीर झाला त्या बद्दल क्षमस्वः. आज आठवणीने लिहितोय कारण १ डिसेंबर, जागतीक एडस दिवस.

आज एडस्ग्रस्त लोकांना समाज सहजा-सहजी स्विकारत नाही. त्यांची व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्यंना देणग्या, कपडे, खाउ द्यायला कदाचित अनेक हात पुढे येत असतिल. पण जो पर्यंत त्या हातंना मायेचा ओलावा नसेल तर ती मदत व्यर्थच.

आज एडस बद्दल माहिती तर घ्यायलाच हवी, शिवाय त्यांच्या जीवनात पण डोकवायला हवं. त्यांना प्रेम देउन आपण त्यांची खरी मदत करू शकतो.

सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

हेमंत मुळे