जंगल में (अ)मंगल - ४

पहिले ३ भाग वाचणाऱ्यांसाठी ही लघु कथा आहे. पात्र परिचय आहेच.
जाणकारांनी पहिल्या ३ भागांचा दुवा देण्याची कृपा करावी.

 पाणवठ्यावर अनेक हरिणे, झेब्रे वगैरे शाकाहारी पाणी पीत होते. अचानक पाण्यातून येऊन मगरींनी अनेकांचा घास घेतला. त्यानंतर हत्ती, कोल्हे, माकडे, जिराफ वगैरे सर्व आपापल्या स्वभावधर्मानुसारच वागले. हरिणे परत मुकाटपणे चरू लागली.
एक सत्ताधारी सर्व प्राणीय सभा पार पडली. त्यांत एकमुखाने एक ठराव पास झाला. शाकाहारी प्राण्यांची, विशेषतः, हरिणांची लोकसंख्या वाढवायची.
एका जिराफाने एका हत्तीला खाजगीत विचारले, "हा ठराव का केला? " हत्ती हळुच म्हणाला, " हरिणे आहेत तोवर आपल्याला कोणी हात लावणार नाही. " या उत्तरावर खुष होऊन माकडाने हत्तिणीला टाळी दिली.