ज्ञानदेवे घेतली | बालवयी समाधी |
चुकवील्या व्याधी | आयुष्याच्या ||
इतरा पाजीले | ज्ञानाचे अमृत |
आपण झाले मृत | स्व इच्छेने ||
बालवयी यांनी | सोशीले अपार |
आणि होता थोर | जाहले विलीन ||
लाउनी दिपीका | पाडीला उजेड |
आपण झाले आड | अंधारात ||
जगी शिंपीयेला | अमृताचा सडा |
कोंदट कोठडा | आपणासी ||
कैवल्याचे दान | दिले पदरात |
आपल्या उदरात | अपराध नाठाळांचे ||
लावीयेला इवलासा | भागवताचा वड |
पारंब्या नि खोड | झाले आता ||
हरीश दांगट