मनाचा ब्रश...

माझ्या मनाचा ब्रश

रंग सारे टिपून घेतो

       गुलाबांच्या गर्दीमध्ये

       रानफुलासही पाहून घेतो

आकर्षक चेहऱ्यांतून

सावळा रंग शोधून घेतो

       बेफाम बेधुंद प्रणयांत

       स्निग्ध प्रेमाला शोषून घेतो

मुखवट्यांच्या बंदिस्त मनात

मनस्वितेला वेढून घेतो

       हॅलोजनच्या झगमगटात

       मंद पणतीचाही प्रकाश घेतो

टिपलेले रंग सारे

माझ्या रंगात मिसळून घेतो

शब्दचित्रे साकारताना

स्वतःलाच मग हरवुन घेतो

           मझ्या मनाचा ब्रश ...