ते दिवस

प्रोफेशनॅलिझमचा बुरखा चढवून
वावरताना सगळी कडे,
हसताना खोटं खोटं,
आणि बोलताना मोजकंच,
तेही तोलून मापून,
शब्द नि शब्द नीट सांभाळत....

आठवतात ते दिवस...
निखळ खळखळून हसण्याचे
कशाचीही पर्वा न करता,
मनात येईल ते बोलण्याचे
उगाच व्यर्थ चर्चांचे
आणि लुटुपुटूच्या भांडणांचे
मनापासून अनुभवलेल्या,
निर्भेळ आनंदाचे...

येतील का ते कधी परत...