उलटून गेले वय

सूर ओठातले माझ्या

सादविती रे मनात

गाणे गुंजत राहते

मग हळूच कानात

शब्दाशब्दात सापडे

एक थिरकती लय

गाणे प्रगट व्हायचे

उलटून गेले वय

आता गुणगुणावे सूर

कधी ओठी कधी पोटी

कुंपणावरती राहावे

जशी अबोल कोरांटी