बेभान जग.... बेभान

बेभान जग बेभान.... बेभान जग बेभान

करू नको टीकेची चिंता, करू नको तत्त्वांचा गुंता
मानवनिर्मित या भगवंतामध्ये नसते जान.... बेभान जग बेभान

असले येथे लाख तरीही भिन्न भिन्न सर्वांच्या वाटा
या वाटेवर तूच एकटा, वाट तुझी सुनसान... बेभान जग बेभान

लाट किनाऱ्यावर आदळते, वाग तिचे तू घेउन बळ ते
पाहा कशी मग दुनिया पळते, सैरावैरा छान... बेभान जग बेभान

रूढी, साऱ्या रीतीभाती, असती वेड्या दुसऱ्यांसाठी
मानु नको तू फक्त स्वतःच्या मनमानीला मान... बेभान जग बेभान