वाऱ्यासारखा

       वाऱ्यासारखा........

आठवणीत तुझा स्पर्श अजून

नुकत्याच घेतल्या श्वासासारखा,

पण माझं प्रारब्धच जणू की

मी जाहलो दगडासारखा.

पाण्याच्या दर्पणात तुझा

चेहरा चंद्रासारखा,

पण संदर्भच चुकला जणू

अन मी पौर्णिमेला पारखा.

इतकी रचली होती

कडवी तुझसाठी,

पण ओठांवरतीच थांबला शब्द

का माहीत मौनासारखा?

माझ्याच रचिल्या दुनियेकडं मग

मी पाहतो अज्ञातासारखा,

क्षणात सारं जणू भग्न अन

           मी पुन्हा एकटाच वाऱ्यासारखा..........