काळाने हलवून जागे केल्यावर
मी डोळसपणे घेतला स्वप्नपरिस्थितीचा आढावा
आणि स्वेच्छापूर्वक स्वप्नकपातीचा निर्णय घेऊन
रद्द करून टाकले करार
महागड्या,साकारण्याची शक्यता नसलेल्या दीर्घकालीन स्वप्नांचे.
उरलेल्या स्वप्नांपैकी
दिली मुदतपूर्व निवृती
थकलेल्या, पेंगुळलेल्या अकार्यक्षम स्वप्नांना!
आणि
बाकी दोन चार 'आवश्यक' स्वप्नांनांही
सांगीतलं यायला
आठवड्यातून फक्त तीन रात्री.
हे असं करावंच लागेल
ही स्वाप्निक मंदी किंवा आयुष्य
एक काहीतरी सरेपर्यंत.
(जयन्ता५२)