अफजल

अफजल आला, अफजल आला!

अफजलने बघ विडा उचलला.

'डोंगरातला उंदीर त्याला

 हां हां म्हणता मीच पकडला! '

हत्ती आले, घोडे आले,

उंटासंगे, खेचर चाले!

तलवारी अन ढाली आल्या,

भाले बरच्या सिद्ध जाहल्या!

ईरीशिरीवर तोफा नटल्या!

सर्वांनी मग कमरा कसल्या!

कुठे चालला सर्व सोहळा?

शिवरायांना पकडायाला!...१

अफजल आला, अफजल आला!

तुळजापुरी तो अवचित घुसला!

अंबेवरती घाव घातला,

'मुर्तीभंजक' म्हणूनी मिरवला!

पंढरीत हो पुनरावृती,

शिवऱ्हृदयाची पाही शक्ती!

स्वराज्यात तो  गोंधळ घाले,

रयतेने तर हात टेकले!

देशमुखांना दिधली धमकी,

पाटलांसही आली तंबी!

धीर धरा रे, थांबा थोडे

भरत चालले पाप घडे!...२

अफजल आला, अफजल आला,

काय करावे काही सुचेना!

'दुर्ग-प्रतापी होऊ गोळा,

खानावरती चढवू हाल्ला'

कन्होजीनी साद घातली,

मावळामध्ये ती दुमदुमली!

'कापायाचा आता बोकड'

विचार ठरला मनात फक्कड!!

अफजल आला, अफजल आला!

काय करावे काही सुचेना!

'दुर्ग-प्रतापी होऊ गोळा,

खानावरती चढवू हल्ला! '

कान्होजीनी साद घातली,

मावळामध्ये ती दुमदुमली!

'कापायाचा आता बोकड'

विचार ठरला मनात फक्कड!

जंगलातल्या वाट सगळ्या,

घासासाठी त्या आतुरल्या!

'बाळा माझ्या खानच खाई!

सूड हवा मज' वदे जिजाई!...३

अफजल आला, अफजल आला!

वाईमध्ये तंबू ठोकला!

शिवबाने मग युक्ती केली,

पंताजींना वकिली दिधली!

"घाबरलासे शिवा तुम्हाला,

साऱ्या सेनेसोबत यावे,

शिवरायांना संगे न्यावे"

खानालाही पटले सारे!

'उंदीर हाती सापडला रे"

घाटामध्ये गलका झाला

"अफजल आला, अफजल आला!"

अफजल आला, अफजल आला!

जावळीत हो पुरा गलबला!

अवघड जागी मांडव सजला,

खाना खाण्या तो आसुसला!

भेट जहाली, विचित्र घडले!

उंदराने की डोंगर गिळले!

खान उडाला! सैन्य पळाले!!

नेताजीने रण गाजविले!!

तुळजा माता प्रसन्न झाली,

सुहास्य वदने यशदा ठरली !

शिवरायांची किर्ती गाण्या,

धावत सुटल्या कृष्ण-कोयना!!...५

अफजल गेला, अफजल गेला!

बादशहाचा धीरच खचला!

पराक्रमाची शर्थ जहाली,

शिवरायांची फत्ते झाली!! ...६

----------

टीप- कान्होजी- कन्होजी जेधे शिवाजी राजांचे जेष्ठ सहकारी

'बाळा माझ्या खानच खाई' ... जिजाबाईंचा थोरला मुलगा, संभाजी अफजलखानाने कपटाने मारला होता.

पंताजी- कृष्णाजी भास्कर - शिवाजी राजांच्या दरबारातील एक मुत्सद्दी

नेताजी- नेताजी पालकर- शिवाजी महाराजांचा विश्वासू सेनापती.