सतार

नादब्रह्म घुमला हुंकार

अंतरि स्फुरला शिव ॐकार

स्वप्न जाहले जणु साकार

स्वरविश्वाला ये आकार

गात्रीं तंत्रीची ये तार

स्पर्श-वेदनें साक्षात्कार

..........

शब्दगंधस्पृशरूपरसांना आला एकाकार,

दिडदा दिडदा स्वर देहातुन - पिंड झाला सतार

अवघा पिंड झाला सतार............