आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल विश्राम
आज, सर्दी फार झाली पण कुठे तो बाम आहे
चोंदल्या नाकात माझ्या पार ट्रॅफिक जाम आहे
पाहते ती वाट माझी, मी घरी जोषात जातो
पण तिच्या बापास बघता, येत मजला घाम आहे
खूपसे समदुःखी आणिक वानवा नाही बघ्यांची
आमचा हा बायकोशी चालला संग्राम आहे
बायको पाहून दारी बांधतो अंदाज आम्ही
स्वागताला आज अमुच्या काय जो इतमाम आहे
पत्नीपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच नवरे
घासतो भांडी कुणी, कोणी गडी घरकाम आहे
चार खंबे ढोसण्यासाठीच जमले दोस्त माझे
बोलले, " नाहीतरी मज काय दुसरे काम आहे? "
पाडुनी गेलाच शेवट शब्दपाचोळ्यास "केश्या"
तो तसा धर्मास अपुल्या राहिलेला ठाम आहे...