दूरस्थ...!

दूरस्थ मी मलाच नेमस्त पाहताहे,

अन अंतरी जिव्हाळा, परकाच वाहताहे ।

मी मुक्त, बद्ध किंवा, नाहीच मागमूस,

चाहूल मी उद्याची नित्यात घेत आहे ।

आरंभ काय होता? अन शेवटास काय?

हे प्रश्न मी तसेच मध्यात सोडताहे ।

अव्यक्त होत होता व्यक्तित्व ये भरास

म्हणुनीच मी अनंती तल्लीन होत आहे ।