निघाली जिंदगी तेथुन मरेपर्यंत गेली ती
जगावे वाटले होते, जगेपर्यंत गेली ती
नशाशी मीपणाची यायला झाली सुरू होती
मध्ये ही जाग आल्याने चढेपर्यंत गेली ती
तिची सोडून जाण्याची हजारो कारणे होती
नको जाऊ म्हणावे मी, कळेपर्यंत गेली ती
नवी आहे म्हणावी वेदना की ही जुनी आहे
तिच्या माझ्या अटी साऱ्या ठरेपर्यंत गेली ती
करावे शौक भूषण, पण तुझे आता अती झाले
बुडाली पेशवाई उत्तरेपर्यंत गेली ती