गेली हवा स्पर्शुनी
काटा अंगावर आला
निळ्या नदीपलिकडे
उगवला चंद्र ओला ll ध्रु. ll
तुजकडुनी जे लाभले
जीवन ते जपले मनी,
तुजविना कालही
आजही, नाही कुणी ll १ ll
जवळ तुझ्या यावे तसे
अंतर हे वाढे कसे?
कुठेतरी, दूरवरी
झलकही तव ना दिसे ll २ ll
गावी कुण्या अज्ञातशा
मन जाते मज घेउनी,
तुजविना दिनरातही
नाकळे मज मनी ll ३ ll
मूळ हिंदी गाण्याच्याच चालीत बसेलसं भाषांतर करायचा प्रयत्न केलाय. कसा जमलाय / फसलाय ते जरूर सांगा. सूचनांचं स्वागत आहे.
गाणं ओळखा, गायक-गायिका, चित्रपट-अल्बम याविषयी माहिती सांगा. उत्तरांची वाट पाहतेय.