संत व्हॅलेंटाईनची आरती !

------------संत व्हॅलेंटाईनची आरती------------

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन
आला, आला, आला तो सुदिन ॥ ध्रू ॥

घेती तुझे नाम आज १४-फे
पाठविती एकमेका किती लिफाफे
लिफाफ्यात त्या पत्रिका 'बदामी'
'तूच माझी' अशी प्रत्येकीस हमी!

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन......
आला, आला, आला तो सुदिन

आजच्या दिनी खरेदी प्रचंड
आई-बापांना नसता भूर्दंड
विसरले सारे या देशीचे संत
तू परदेशी पण तूच पसंत

हे गॉड, हे गॉड व्हॅलेंटाईन
आला, आला, आला तो सुदिन

जयन्ता५२ (आधी मनोगत'वरच प्रकाशित)