आरती व्हॅलेंटाईनची

जयदेव जयदेव जय व्हॅलेंटाईन

सोबतीला कन्या हातात वाईन

वर्षातून एकदा हा तुमचा दिवस

तुमच्या दिवशी वाढे सर्वांची हवस

तुमच्या पायी प्रेमिक करताती नवस

खातात गुपचुप प्रेमाचा खरवस - १

कुणाकुणा साठी तुमचे हे प्रेम

आयुष्याला नाही वळण नेम

सर्वांचे तरीही चालते क्षेम

व्हॅलेंटाईनचा छान हा गेम - २

तुमच्या योगे कित्येक तरून गेले

तुमच्या पायी कित्येक मरून गेले

तरीही उठाठेव तशीच चाले

आनंदी आनंद सर्वत्र डोले -३