बोलणे बेंबीतळापासून ते

आमचे प्रेरणास्रोत : भूषण कटककर यांची मस्त गझल बोलणे त्याचे मनापासून ते...

विडंबनातील सर्व शेर बरबाद आहेत. एक जरा बरा होता तो वगळला आहे. मार्गदर्शनामुळे मला हल्ली असेच सुचते. धन्यवाद!

ती म्हणाली तेच झाले शेवटी
ढोसली अन् रेच झाले शेवटी

बोलणे बेंबीतळापासून ते
श्रोतृगण बहिरेच झाले शेवटी

एवढा खोटे खरेच्या कच्छपी
की तिला पोट्टेच झाले शेवटी

हालचाली आमच्या थंडावता
व्हायग्रा होतेच, झाले शेवटी

खात मी बसलो अधाश्यासारखा
आतड्यांचे पेच झाले शेवटी

प्रेम ज्यांचे नाव होते ठेवले
ब्रह्मचारी तेच झाले शेवटी

खोडसाळा, तू जसा देवास त्या
काव्यही प्यारेच झाले, शेवटी