कुंदी आणि मंदी

प्रेरणा : 'क्षणाचा सोबती' यांची कविता 'संधी आणि मंदी'

मंदी आणि कुंदी

यांची कधी होत नसते ’जुगलबंदी"?

दोघी एकमेकींच्या सवती

घुटमळतात दोघी नवर्‍याच्या अवती भवती

मंदी असल्यास कुंदी पाळत ठेवते

कुंदी दिसल्यास मंदी तिला जळवते

मंदी चुकवता येत नाही

कुंदी रुसली की जवळ येत नाही

मंदी जाता जात नाही

कुंदी येता येत नाही

मंदी जाण्याची वाट बघावी लागते

कुंदी येण्याची वाट बघावी लागते

मंदी असताना चुकून कुंदी आली तर

हे नवर्‍या तिला झापलेसे कर

अन्यथा मंदी तिला खाऊ की गिळू करेल

आणि नवर्‍याची कंबख्ती ओढवेल

एक मंदी पुरे आहे घराला डोक्यावर घ्यायला

मात्रा फक्त एकच योग्य; कुंदी आवश्यक आहे, मंदीला जळवायला...

मंदीला जळवायला...!!

- खोडसाळ
"अर्थो मा द्वयर्थगमय
 द्वयर्थो मा निरर्थम् गमय
 ॐ अशांतिः अशांतिः अशांतिः"*

*- संस्कृत-तज्ज्ञहो, चु. भू. दे. घे.