खारे दाणे

  • २ वाट्या कच्चे शेंगदाणे
  • पाणी
  • मीठ
३० मिनिटे
मला एकट्याला पुरते

कच्चे शेंगदाणे मध्यम आकाराच्या पातेल्यात पाण्यात भिजत घाला.  शेंगदाणे बुडुन वर २५ मि.मि. पाणी राहू द्या.  त्या पाण्यात २ चमचे मीठ घाला.  १५ मिनिटे भिजल्यावर विस्तवावर त्या पाण्याला चांगली उकळी येऊन २-३ मिनिटे उकळू द्या.

थोड्या वेळाने ते दाणे रिवळीत किंवा चाळणीमध्ये घालून ५ मिनिटे निथळू द्या. 

ते दाणे खाण्याच्या काचेच्या पसरट बशीमध्ये एक थराने पसरून ते अतिसूक्ष्म लहरीच्या भट्टीमध्ये काळजीपूर्वक भाजा. 

एक-दोन वेळेला भाजल्यावर तुम्हाला दाणे नीट आणि न जळता भाजण्याची हातोटी साध्य होईल.  भट्टीच्या ताकदीवर वेळ अवल.बून असतो.  साधारण २-३ मिनिटात दाणे चांगले भाजून होतात.  पाहिजे असल्यास एका वेळेला एक मिनिटापेक्षा जास्त तापवू नयेत.  शेवटच्या काही सेकंदात एकदम दाणे करपून जाउ शकतात हे लक्षात ठेवा.

भाजलेले दाणे थंड होऊन द्यात.  मग खायला तुम्ही मोकळे.  हवे असेल तर भाजलेल्या दाण्यांची साले काढून टाका.  अशाच रितीने काजू किंवा बदाम खारवू शकता.

करून बघितल्यावर सांगा कसे वाटले ते.

कलोअ,
(दाणेभक्त) सुभाष

टोस्टर ओव्हन किंवा साध्या ओव्हन मध्ये पण करू शकाल, पण का???

स्वानुभव