रे 'मना'! मी तुजला
कैसे वर्णू ?
विविध रंगछटांतुनी , दाखवी
अस्तित्व आम्हाला तू !!
मोदभरित चहू क्षणांनी या
हर्षभरित जाहलेस तू ,
तरीही नयनांच्या कोंदणी
ओघळावे का आनंदाश्रू ?
दुःखित जीवन पाहुनिया
वेदना लपवशील तू
धडधड मनीची नच जाई
दावी अपुले हळवेपण तू !!
कधी मातेचे काळीज बनुनी
प्रेमवात्सल्य वर्षवी तू
बालमनाच्या कुपीत असता
बसते निरागस होउनी तू !!
प्रेमिकांच्या हृदयी राहुनी
चित्त विचलित करिसी तू
दोन जीवांचे मीलन इथे
नसे वेगळे 'मी' अन 'तू' !!
गोड सुरांच्या इंद्रधनूने
संगीत प्रेमीला न्हालेस तू
भैरवीचे स्वर आळविता
झेप घेसी प्रभूकडे 'तू' !!