(अंमळ)

आमची प्रेरणा अदितीताईंची सुरेख कविता अंमळ

तुझ्या बुटांच्या  वासाने  ही होते मळमळ
इथे अता मज उभे राहणे अशक्य केवळ

पुन्हा पाहिले, कोष्टकात ,  हुकली तारीख
घरी सांगणे, लक्ष लागणे, कठीण अंमळ...

विग लावला वरून जरी हा  खोटाखोटा
कथा समजली तुझे कुणी हे केले जावळ

अवचित आले तात तिचे ते दारावरती
दार उघडता माझी झाली किती धावपळ

क्षणाक्षणाला पडते आहे काव्य इथे बघ
'केश्या" मेल्या  तुझी अता मग आहे चंगळ

--केशवसुमार
( २५ फेब्रू. २००९,
माघ अमावास्या, शके १९३०)