राजकीय पक्षांची संकेतस्थळे

मागच्या आठवड्यात श्री. राज ठाकरे यांनी 'म.न.से.' चं संकेतस्थळ सुरू केलं. (दुवा क्र. १ )

भाजपा,( दुवा क्र. २ ) काँग्रेस ( दुवा क्र. ३ ) व इतर पक्षांची संकेतस्थळे आधीच आहेत, त्यात आणखी एक भर पडली. इतरांपेक्षा मनसेचं संकेतस्थळ अधिक आकर्षक वाटलं. विशेषतः महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्याची माहीती, वैशिष्ट्य.

यावरून काही प्रश्न माझ्या मनात आले.

१. राजकिय पक्षांना संकेतस्थळांचा कितपत फायदा होतो ?

२. भारतात जालाचा उपयोग करणारे वाढत असले तरी या संकेतस्थळांना किती लोकं भेट देतात ?

३. संकेतस्थळावरून निवडणुकीचा प्रचार यशस्वी होवू शकतो ?

४. जर १ % लोकं ( १ कोटी ) जालाचा उपयोग करत असतील तर ते या संकेतस्थळांना भेट देउन 'मत' देतील का ?

५. राज ठाकरेंनी जसं वेगळ्या स्वरुपात संकेतस्थळ बनवलं त्यातून ते वेगळं काही करू शकतात असं वाटतं का?

६. संकेतस्थळ बघून त्या पक्षाविषयी तुम्हाला संकेतस्थळासारखीच संघटना असावी असं वाटतं का ?