अज्ञेय-२

आमची प्रेरणा कोहम यांची गझल अज्ञेय

कवितेची  वाट  लावणे  स्वाभाविक आहे
मुळात मीही तुमच्यागत  साहित्यिक आहे

रिक्षासाठी वणवण केली गल्लोगल्ली
अखेर कळले   संप आज लाक्षणिक आहे

मला खेटण्या असेल आली अनेकदा ती
ओळखता आले न ती व्यावसायिक आहे

मिठी सोडुनी निघून जातो उगीच का हा
सजून घ्या  ना कारण थोडे तांत्रिक आहे

हात तिने हातात दिल्याने नकोस दचकू
मला वाटते स्पर्श तिचा आध्यात्मिक आहे

उगाच  उठल्या त्यांच्या लग्नाच्या या अफवा
नंतर कळले ते नाते  प्लाटूनिक  आहे

नाहित मात्रा, नाहित वृत्ते, छंद ही नाही
तू   न कवी,   तू " केश्या " काव्य खाटिक आहे