(वारसे)

प्रेरणा : वारसे

पाक हा नाही तुला, ना तुला अनारसे
गोड सारे यापुढे वर्ज्य मधुमेहा असे

सटकल्या उपवर मुली भिंत ओली पाहुनी
राहिले मापाविना उंबरे बेजारसे

’सावली’ शोधावया अक्ष भिरभिरती इथे
मग‌ स्वत:चा पाडण्या भांग शोधी आरसे

घेतले बिंदास फ्लू-ग्रस्त पुरुषांचे मुके
त्या मुलींच्या नासिका चोंदल्या; बसले घसे

वडिलधार्‍या पातल्या तेव्हढ्या भेटायला
जाहले मग घन तमी केव्हढे माझे हसे !

पाडसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहर्‍यावर काळजी, परवडे ना बारसे

विहर तू काव्यात पण विहर चिलखत घालुनी
खोडसाळाचे इथे नेहमी दिसती ठसे