हो मुक्त तू

श्री. जयंता५२ यांच्या कवितेवरून

ये निवडुनी फुसक्या वचननाम्यातुनी
हो मुक्त तू साऱ्या जुन्या वचनातुनी

मत देवुनी झाली सजा कळले मला
शून्यात आलो परतुनी शून्यातुनी

आता कुणाचे 'मौन'ही झाले जुने
द्या उत्तरे आता पुन्हा शब्दातुनी

'गावात' तुझिया पेटले सारे दिवे
अन दाटला अंधार हा शहरातुनी

भोगेल कर्माची अडाणीही फळे
अपराध केला निवडुनी देण्यातुनी