देव आहे सामावलेला चोहीकडे
नको मंदिरात , माणसात शोध तू.
सुख-समाधान मिळत नाही विकत
नको पैशात , चांगुलपणात शोध तू.
खचायला नको गळतीने कधी
नको शिशिरात , वसंतात शोध तू.
भाळणे नको बाह्यरूपावर
नको चेहऱ्यात , मनात शोध तू.
अंधारले म्हणून काय झाले?
नको अस्तात , उदयात शोध तू.
लपंडावच तो सुखदुःखाचा
नको बाहेर , हृदयात शोध तू.
.... आरती