झाली आबाळ आबाळ

श्री./सौ. नगरीनिरंजन यांच्या 'पहिला पाऊस' या कवितेवरून...

झाली आबाळ आबाळ । रंग मातीला सुटला ॥
लेकरांना 'माया' म्हणे । पक्ष देवाचा फुटला ॥

जन खट्याळ खट्याळ । जरा दाखविती इंगा ॥
कानशिले चप्पलांनी । पेटवून करी दंगा ॥

अस्सा डोळा आणि डोळा । कसाबसा रे झाकला ॥
'शीण' सारा नटीनेही । एका क्षणात टाकला ॥

होता कल्लोळ कल्लोळ । खाते कोण 'झाडा'आड ॥
माजलेल्या 'पामरांची' । दशा झाली गजाआड ॥

झाला गोंधळ गोंधळ । आता खावी थोडी चिंच ॥
लसीकरण कराया । लग्नाआधी आले 'थेंब' ॥

बोले अघळ पघळ । 'वरुण' राजाची ही 'माया' ॥
हात तोडी म्हणे राजा । वीष लागले पेराया ॥