बोलका

स्पर्श फार बोलका असे तुझा
लांबुनीच तोडगा असे तुझा

मानवास बांधले पशूसवे
कोण यात वेगळा असे तुझा?

काल ठेवले उगाच तू घरी
वेदनेस त्रास हा असे तुझा

आज चिंब पावसात होवुया
नेहमीच अश्रु का असे तुझा ?

मी निमित्तमात्र गात राहिलो
राग, श्वास अन गळा असे तुझा

लाज तोंड उघडण्यास वाटु दे
चेहराच बोलका असे तुझा