(सोडू नको)

श्री मिल्या यांच्या सोडू नको या गझलेवरून ...

संपले मुद्दे तरी बोलायचे सोडू नको
चोरवाटेने प्रसंगी जायचे सोडू नको

मी तुला नक्की कधी लाटेन हे सांगू कसे ?
एवढे सांगेन की, 'मत द्यायचे सोडू नको'

मुकुटही घडतील आपोआप देवाच्या शिरी
तो भिकारी, तू भिकारी; घ्यायचे सोडू नको

काय हत्ती करिल ज्याचा हातही काटा असे..
कमळही भुंगा बनूनी खायचे सोडू नको

पाहिजे तर सांग गेलेल्या कुणाचा वंशही
पण जरासे सूतही लाटायचे सोडू नको

तू न पुतण्या, तू न भाचा; माहिती आहे मला..
बोल थोडेसेच.. पण बरळायचे सोडू नको