कवींची मैफिल होती
मी ही म्हटले ऐकवावे काही
सुटलाच जर तोल सभेचा
आलाच कुणी सरसावून बाही
मी म्हणेन....मी म्हणेन
ही कविता माझी नाही
या पेक्षा मनोगत बरे
कांदे तर येत नाहीत खरे
आल्याच जर टिका फार
तरी घाबरायचे कारण नाही
एकच प्रतीसाद वाढवावा
ही कविता माझी नाही
छंद, यमक नका पाहू
आवडली नाही? नका साहू
पहिलाच प्रयत्न आहे
जमतोय का हे तरी पाहू
पण राग मात्र धरू नका
कारण.... ही कविता माझी नाही