द्यावे मजला मार्ग ऐसा

सांग केशवा सांग मजला
धनुष्य हाती कसा घेवु मी

ज्या
काळजातून प्रेम मजवर
उतंड वाहिले अविरत आजवर
त्या काळजाचा घोट कसा
सांग
मजला घेवू मी
सांग केशवा सांग मजला.........

ज्या डोळ्यांनी
पाहिले
नेहमी माझ्या सुखांचे स्वप्न
त्या डोळ्यांचा घात कसा
सांग मजला करु
मी
सांग केशवा सांग मजला.........

खेळलो मि ज्यांच्यासंगे
बालपण
ज्यासवे गेले
बालपणीच्या त्या विश्वाचा
अंत कसा पाहू मी
सांग केशवा सांग
मजला.........

धनुष्य हाती ज्यांनी दिले
ज्यांच्या वचना जिवन
फ़ुलले
त्या वचनांचा त्या विद्येचा
अवमान सांग कसा करु मी
सांग केशवा सांग
मजला.........

म्हणुन मागतो आहे केशवा
द्यावे मजला ज्ञान ठेवा
सुटावा
हा मनीचा गुंता
द्यावे मजला मार्ग ऐसा....