पुळचटांची गर्दी

श्री प्रदीप कुलकर्णी यांच्या 'मेंदूच्या चौकात' या गझलेवरून

स्वारांची नसते, न हुशारांची गर्दी
बाजूने माझ्याच पुळचटांची गर्दी

व्यासंगावाचून सफाईने जमवी
कुठल्याही विषयात टुकारांची गर्दी

गुरुजींच्या नावावर शिष्यांना मिळते
मरतुकड्या कवितेवर हारांची गर्दी

वाटावे ओठांस कुणाच्या, काहीही
गालांवर माझ्याच नकारांची गर्दी

लेकाला अजिबात जमेना चटणीशी
मग झाली पानात मटारांची गर्दी

मिळते कोण्या कारकुना घर हक्काचे
होणारच गावात सुमारांची गर्दी

ही आहे तुंबून किती वर्षे येथे-
ना मेंदू , गुडघ्यात विचारांची गर्दी