आता पाउस येईल तुझ्या आठवणींच्या सरी घेउन.
गेली अनेक वर्षे मी पाउस भिजलेलो नाही.
तुझ्याशिवाय हा पाउस नकोसा वाटतो, त्या सरी नकोश्या वाटतात.
म्हणजे थोडक्यात, पाउस अगदी नॉर्मल वाटतो गं!
तुला आठवतो तो आपला पहिला पाउस वरळी सी - फेसचा?
भिजलेली मनं आणि थरथरत्या श्वासांचा,
त्यानंतर असा पाउस कधी आलाच नाही.
त्यानंतरचे सगळे पाउस मी फक्त शरिराने भिजलो, मनाने नाही!
मन तसचं राहतं, तहानलेलं, अतृप्त!
पाउस कोसळत राहतो, सरी भिजवत राहतात, वारा झोंबत राहतो.
तु नसतेस सोबत, आणि आठवत राहतेस कोसळणाऱ्या प्रत्येक सरींबरोबर
तुला येते का गं माझी आठवण पावसाच्या सरींबरोबर????