सारिपाट नात्यांचा

आज मनाला वाटत होती;
एक अनामिक भीती;
बघता बघता हसता हसता;
जुळली होती नाती;

त्या नात्यांना नावे नव्हती;
नव्हते ऋणानुबंध;
फक्त होता स्वार्थ;
आणि बिनबुडाचा संबध.

टिकतात अशी नाती;
आळवावारच्या पाण्यासारखी;
पण देउन जातात आठवणी;
आयुश्यभर सलण्यासाठी.

नातं ज्याच्याबरोबर जुळतं;
त्याला मनं आपलं मानतं;
त्याच्याच दिवास्वप्नांवर;
ते वेडं पुन्हा उभारी घेतं.

जे नातं शिकवतं तुम्हाला;
पुन्हा नव्याने जगणं;
तेचं देउन जातं तुम्हाला;
प्रत्येक श्वासागणिक झुरणं.

इतकं सगळं होउनसुद्धा;
आपण मनाची पाटी कोरी करतो;
हारलेल्या रणांगणावर पुन्हा;
नात्यांचाच सारिपाट मांडतो.