जवळा वांग

  • १ वाटा जवळा
  • २ वांगी
  • २ कांदे चिरून
  • २ ते ३ चमचे तेल
  • २ चिमुट हिंग
  • पाव चमचा हळद
  • १ ते २ चमचे मसाला
  • चविपुरते मिठ
  • १ मिरची, कोकम ३-४ किंवा टोमॅटो १.
  • थोडी कोथिंबीर चिरून
१५ मिनिटे
३ ते ४ जणांसाठी

प्रथम जवळा चांगला २ ते ३ पाण्यातून धुवून घ्यावा मग वांगी कापून घ्यावीत. भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत तळावा. मग त्यात हिंग, हळद, मसाला घालून जवळा व वांग घालाव. थोडे पाणी घालावे किंवा वाफेवर शिजवला तरी चालतो. ५ मिनिटांनी ढवळून त्यात मिठ, मिरची, कोकम किंवा टोमॅटो घालावे. परत थोडावेळ वाफ आणावी. आता त्यात कोथिंबिर घालावी व २ मिनीटे वाफ आणून गॅस बंद करावा.

गरजे प्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी अधिक करावे.  मिठ कमिच घालावे कारण सुका जवळा खारट असतो.

आई