आमचा प्रेमाचा अनुभव

" नमस्कार!!!
छे मी हे काय म्हणतोय! कधी कधी आपल्याला कळतच नाही आणि अनवधानाने का होईना असे इंग्लिश शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात. पण त्याने आपली मराठी मात्र समृद्ध होत जाते, यात कुणाचाच दुमत असण्याच कारण नाही. आपण सगळे इथे संवाद करतोय ते आपला मराठीवर अतोनात प्रेम आहे म्हणूनच. नाहीतर कशाला असता हा नसला खटाटोप...... तर मी सांगणार होतो जुन्या आठवणी. आयुष्याच्या या वाटेवर काही लोक काही क्षणांकरिता का होईना आपल्या आयुष्यात डोकावून बघतात आणि नंतर मात्र संपूर्ण आयुष्यात मनाला हुरहूर लावून जातात. ती सीमा, असाच एकदा महाराष्ट्र एक्सप्रेस ने घरून येत होतो. मी रिझर्वेशन डब्यात. पाहिजे अशी गर्दी नव्हती. आणि नागपूर पासून पुणेचा 16 तासांचा प्रवास म्हणजे फार बोरिंग. बरंच वाचून झाला पण दिवस जाईना. काय करावं, कुणाशी बोलाव काही सुचत नव्हता. अशातच ती आली, ऍक्चुअली ती माझ्या आधीच गाडीत होती. सहज बोलाव म्हणून मीच विषय काढला, "कुठे पुण्याला जात आहेस? "ती म्हटली "हो म्हणजे मला जायचं आहे कराड ला पण मी पुण्याला ड्रॉप होऊन मग कराड ला जाणार आहे! ". ती काही पाहायला फार स्मार्ट होती असा काही नव्हता पण एकूणच तिने स्वतःला तिच्या मोकळ्या स्वभावाने आकर्षित केलं होता. बोलता बोलता किती वेळ निघून गेला कळलाच नाही. आम्ही पुण्याला आलो. मला वाटला आता आपण कधीच भेटणार नाही. पण आयुष्याला हे मंजूर नसेल कदाचित. माझ्याकडे तिचा नंबर नव्हता. पण तिच्याकडे माझा होता. ऍक्चुअली तिने माझ्या मोबाईल वरून एक फोन केला होता आणि तोच नंबर तिने जपून ठेवला असेल. आठ दहा दिवस नंतर असाच मित्र बरोबर गप्पा मारत होतो आणि मोबाईल वर कॉल आला नंबर ओळखीचा नव्हता, एसटीडी नंबर होता............ मी म्हणालो " हेलो " आवाज आला "हाय शैलेश ओळखलंस? " मी "नाही कोण बोलताय? कोण हवंय आपल्याला? " "मी सीमा बोलतेय " "कोण सीमा? " "अरे आपण गाडीत भेटलो होतो " "अच्छा अच्छा सीमा बोल कशी आहेस आज माझी आठवण काढलीस? " मग आमचे असेच फोन कॉल्स चे सत्र 6 महिने सुरू राहिले. कदाचित बीएसएनएल ला तेवढाच नफा. हळू - हळू मी मात्र तिच्यात गुरफटत गेलो.......... ब्रेक... तुम्हाला माझी रिअल लाईफ स्टोरी आवडली तर कळवा ब्रेक नंतर चा ट्विस्ट पुढे सांगेल.
शैलेश..... "

यानंतर खूप काही घडलं............. बरं वाईट दोन्ही पण शैलेश पुढे लिहायला तयार नाही............ तेव्हा जर तुम्हाला हि स्टोरी ऐकायची असेल आणि आवडली असेल तर ती पूर्ण करायसाठी त्याला प्रोत्साहन द्या. कारण खरं सांगायचं तर मला स्वतःलाच ऐकायचा आहे.

सीमा


नमस्कार!!!
हा लेख मला अगदी काही दिवसां पूर्वी मिळाला, मिळाला म्हणा की प्रत्यक्षात लिहिणाऱ्यानेच दाखवला म्हणा... पण हा लेख ३ वर्ष नंतर (फेब्रू २००६ मध्ये लिहिलेला )माझ्या पुढे आला. तो जसाच्या तसा मी तुमच्या समोर पुन्हा ठेवत आहे........ पुन्हा यासाठी ठेवत आहे कारण तो अर्धवट आहे आणि तो पूर्ण व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण हि फक्त सुरवात आहे यानंतर या लव्ह स्टोरी त बरेच चढ उतार आलेत.

जर तुम्हाला हि स्टोरी आवडली असेल तर कळवा आणि शैलेश ला ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्या.