आल्याचे गोड सूप

  • आले १ इंच तुकडा
  • धणे १ टीस्पून
  • पाणी १ कप
  • मध १ टीस्पून
  • लिंबाचा रस - २-४ थेंब (आवडत असल्यास)
५ मिनिटे
१ माणसासाठी

आल्याचा तुकडा ठेचून तो कपभर पाण्यात घालावा. धणे पावडर करून त्यात मिसळावे. हे मिश्रण उकळावे. उकळून गाळावे व मग त्यात मध घालावा. आवडत असल्यास थोडा लिंबाचा रस घालावा. गरमागरम, वाफाळते प्यावे.

घशाला, पावसाळी हवेत खूप छान पेय आहे. चहाऐवजी प्यायलापण खूप छान. आवडत असल्यास त्यात इतर मसाले, जसे, दालचिनी, मिरी इत्यादीही घालू शकता. झटपट होणारे व आरोग्यदायी पेय.