लग्न - २

दारा समोर गुलाबी फवारा,मध्य भागी डी. जे.
आलेली हितसंबंधी हि हि माणसे
समीर चे लग्न सगळीकडे लखलखाट
चकचकीत स्वच्छता टेबल आणि खुर्च्यांची

झगमगणारे दिवे, हिरवी गार लॉन
कोपऱ्यात टेबल टेबलावरची मांडा मांड स्वछछ्तेची
धांगड धिंगा करत नाचणारी ओरडणारी पोर
चमचमत्या टेबला समोर रांग ति हि माणसाची

हातात ताट, ताटा खाली रुमाल तो हि कागदी
ताटात सलाड, बाजूला वाटी चमच्याच्या शोधात
माझ्या सारखा एखादा सरळ लाईनित घुसलेला
आरडाअओरड करणाऱ्याचा धक्का गुलाब जामून वाल्याला

हातात दोन दोन प्लेट सौ ला शोधणाऱ्या नजरा ह्या हि माणसांच्या
अहो बाबा इकडे इकडे  करत म्हणणारे पोर
अहो तिथे सासरे बसलेय म्हणत ओढणाऱ्या खुर्च्या
घे घे करत जास्तच थोडं वाढून घेणारी हि माणसेच

दोन पुऱ्या भाजी घ्या हो म्हणणारे
तुम्ही चालले मला हि थोडं श्रीखंड आणा म्हणणारे
जास्त झालेलं अन्न तसेच टाकून देणारे
एकदा गेलो आता नको म्हणत अर्धवट जेवणारे

हे समीराचे काका बरं का ओळख देणारे
उष्ट्या हाताने नमस्कार करणारेही माणसेच
झटपट हात पुसून कागदाचा बोळा ईस्ततः फेकणारे
पैसा खर्च केला पण जेवणावळी वाल्याने लुटले म्हणणारे

चला हो करत ओढणारे मी दोनदा आइसक्रीम खाल्लं म्हणणारे
एकाच वेळी दोन दोन पान खाणारे,तरुणी भोवती  घोटाळणारे
लॉनचा एका बाजुचा कोपरा धरून, बघून नबघितल्या सारखे करणारे
चला वेळ झाला म्हणत हिरवळीवर पिचकारी मारणारे हि माणसेच