पाऊले चालती सायबर कॅफेची वाट!

(मुळ गीतकाराची क्षमा मागून मी हि कविता सादर करीत आहे. )

पाऊले चालती सायबर-कॅफेची वाट,

आय-पॉडच्या माळा गळयात घालुनिया,

पाऊले चालती ...

इ-मेल्स ची तर वेगळीच गोष्ट,

रोज विहिडीओ करी आम्ही पोस्ट,

पाऊले चालती...

मोबाइलचे आम्हा भलतेच वेड,

एसमेस-एमेमेसचे आहे आम्हा फॅड,

पाऊले  चालती ...

नित्य-नवे आम्ही डाऊनलोड करी,

कॉमप्युट्र्र-गेम्स असे आमचा जीवन-संघर्ष,

पाऊले चाल्रती ...

पाऊले चालती सायबर-कॅफेची वाट,

अभ्यासाच्या नावे बोंबा मारुनिया,

पाऊले चालती सायबर-कॅफेची वाट.