झोडल्यानंतर..

सापडे आयते वाचल्यानंतर । इथे जालावर काव्य खूप ।
त्यातील हे एक "सोडल्यानंतर" । ज्याचा समाचार घेतलासे ॥

कुणास ठाउक असे कवी का जनात आले?
मनास येईल ते "काव्य" ज्या मनात आले !!

तुझ्या तनूला नसेल काहीच डौल आता
असे दुपारी उगाच माझ्या मनात आले !

"लिहायचा नाइलाज आहे म्हणून लिहितो"
विडंबकाच्या कितीक वेळा मनात आले !

तुझे तिथे "पाडकाम" चालू निवांत सध्या
निवांत चालू नये असे का मनात आले?

उगाच व्याख्या नवी नको ऐकवू 'गझल' ची
तुला तुझी ना पटेल व्याख्या, मनात आले !

विडंबकाने नयेच झोडू कुणास इतुके-
-मिळू नये की नवीन कविता, मनात आले !